‘माझ्या जीवनप्रवासाचे अवलोकन केल्यावर ‘व्यावहारिक दृष्टीने माझ्यावर अन्याय झाला आहे’, असे वाटते; कारण माझी क्षमता आणि पात्रता असतांनाही मला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली नाही. आप्तेष्टांनी कामापुरते जवळ करून झिडकारले. चाकरी आणि आर्थिक व्यवहारांत हानी झाली. संसारात दुःख पदरी आले इत्यादी; मात्र यामुळेच मी परमार्थाकडे वळू शकलो आणि ही माझ्यावर देवाची कृपा आहे, असे मला वाटते. जागतिक स्तरावरील नोबेल पारितोषक मिळणे किंवा सहस्रो कोटी रुपये मिळण्यापेक्षा अनंत पटींनी अमूल्य असा चैतन्याचा आणि आनंदाचा ठेवा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मिळाला आहे.
देवाची कृपा झाली ।
आप्तेष्टांनी जवळ करूनी झिडकारले ।
परम पूज्यांनी (टीप १) कृपाछत्राखाली घेतले ॥ १ ॥
देवाची कृपा झाली ।
वडिलोपार्जित संपत्ती भाऊबंदकीने लाटली ।
श्री गुरूंनी अनमोल चैतन्याची देणगी दिली ॥ २ ॥
देवाची कृपा झाली ।
सुखसोयी नि चैनी पासून दूर ठेविले ।
राष्ट्र अन् धर्म या सेवांचे कंकण हाती बांधले ॥ ३ ॥
देवाची कृपा झाली ।
आर्थिक देव-घेवीत दिवाळे निघाले ।
आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेने पाऊल पडले ॥ ४ ॥
देवाची कृपा झाली ।
संसारातील सार निघून गेले ।
गुरुकृपेने परमार्थात मन माझे रमले ॥ ५ ॥
देवाची कृपा झाली ।
व्यक्ती, समाज, मोहमायेने सोडले ।
श्री गुरूंनी ईश्वराशी नाते जोडले ॥ ६ ॥
देवाची कृपा झाली ।
भीषण आपत्काळाने घेरले ।
साधना, भाव, भक्ती यांचे प्रयत्न वाढले ॥ ७ ॥
देवाची कृपा झाली ।
विष्णुस्वरूप परम पूज्य मला भेटले ।
जन्म-मरणाच्या फेर्यांतून सोडवले ॥ ८ ॥
देवाची कृपा झाली ।
गुरुचरणी शरणागत झालो ।
अखंड कृतज्ञता व्यक्त करत राहिलो ॥ ९ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|