Delhi LoveJihad Girl Murder : गर्भवती हिंदु प्रेयसीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्या !

देहलीत ‘लव्ह जिहाद’ची नवीन घटना उजेडात

नवी देहली – देहलीतील नांगलोई भागात रहणार्‍या एका १९ वर्षीय हिंदु मुलीची तिच्या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली. ती ७ महिन्यांची गर्भवती होती. तिने तिचा प्रियकर सलीमकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे सलीमने त्याच्या २ मुसलमान मित्रांच्या साहाय्याने हरियाणातील रोहतक येथे पीडितेची हत्या केली आणि नंतर तिला एका शेतात पुरले.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सलीमला लग्नासाठी आग्रह करत होती; पण सलीम लग्नासाठी सिद्ध नव्हता. तो तिला गर्भपात करण्याचा सल्ला देत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले होते. २१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी पीडितेने तिच्या घरातून काही वस्तू घेतल्या आणि ती सलीमला भेटण्यासाठी गेली. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या प्रकरणी पोलिसांनी सलीम आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

आणखी अशा किती घटना घडल्यावर संपूर्ण देशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा होणार आहे ?