रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने झालेल्या चंडियागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘९, १० आणि ११.१०.२०२४ या दिवशी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात महर्षींच्या आज्ञेने चंडियाग करण्यात आला. या यागाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सुश्री (कु.) राजश्री सखदेव

१. यागाचे तीनही दिवस तुळशीचा सुगंध येणे आणि त्या माध्यमातून विष्णुतत्त्व प्रकट झाल्याचे जाणवणे

मला यागाच्या तीनही दिवशी तुळशीचा सुगंध येत होता. हा सुगंध यागाला आरंभ झाल्यापासून याग संपेपर्यंत येत होता. तिसर्‍या दिवशी  तुळशीचा सुगंध पुष्कळ प्रमाणात येत होता. ‘तुळशीच्या गंधाद्वारे तेथे विष्णुतत्त्व प्रकट झाले आहे. विष्णुतत्त्वामुळेच चंडियाग पूर्णत्वास जाऊन त्यातून अपेक्षित अशी फलनिष्पत्ती मिळाली’, असे वाटले.

२. चंडियागाच्या पहिल्या दोन दिवशी नामजप एकाग्रतेने होत होता. त्याच वेळी यागाकडे पाहून भावही जागृत होत होता.

३. यागाच्या तिसर्‍या दिवशी ‘डोळे मिटून रहावे’, असे वाटणे आणि मनाची पूर्ण एकाग्रता साधल्याचे लक्षात येणे

यागाच्या तिसर्‍या दिवशी मात्र मला ‘डोळे मिटून रहावे’ आणि ‘नामजपही न करता शांत रहावे’, असे वाटत होते. माझे लक्ष यागातील मंत्र किंवा नामजप यांकडे जात नव्हते; मात्र श्वासाचे आलंबन आणि ध्यान लागल्यासारखे होत होते. मनाची पूर्ण एकाग्रता साधली जात होती. याग कधी संपला, ते मला कळलेही नाही.’

– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक