‘खरा विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून त्याचा पाया हा साधकत्वाचा असतो. ‘शालेय जीवनात ‘साधक विद्यार्थी’ घडतील’, या दृष्टीने अभ्यासक्रम हवा. आजचा अभ्यासक्रम हा ‘मुलांना पूर्णत: भौतिक स्तरावर मायेत अडकवून स्वत:ला अधिकाधिक सुखी आणि स्वार्थी जीवन कसे जगता येईल ?’, हे शिकवणारा आहे. अशा शिक्षणाने राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती जागरूक नागरिक कसे सिद्ध होतील ? याचे आजचे ताजे उदाहरण, म्हणजे संपूर्ण जगात ‘कोरोना’ विषाणूमुळे गंभीर आपत्कालीन स्थिती असतांनाही तरुण विद्यार्थी वर्ग दिशाहीन सामाजिक माध्यमांमध्ये अडकला आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.