
ब्रिटीशांची देन (देणगी) असलेल्या या पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीने आपल्या पिढ्या संपूर्णतः नासवल्या आहेत. आता बालवाडी पासून नाही, तर अगदी आईच्या गर्भातूनच पुन्हा संस्कार करणे चालू करायला हवे. आपत्काळात देश आणि धर्म संकटात असतांनाही समाजातील लोकांचे अश्लील संकेतस्थळे पहाण्याचे प्रमाणही वाढले आहे. पहा, मनुष्य किती अधोगतीला गेला आहे. साधना करणे दूरच; पण तो साधी माणुसकी जपायलाही सिद्ध नाही. आजच्या विज्ञानाने त्याला देवापासून दूर नेल्याने आता मनुष्याची अशी स्थिती झाली आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मूलभूत संस्कार करणारी !
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !