मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याच्या काही घंटे आधी राज्यपालनियुक्त आमदारांचा शपथविधी निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घाईघाईने घेण्यात आला. त्यामुळे शपथविधीला स्थगिती द्यावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला.
यावर शासनाच्या वतीने न्यायालयाने ‘आमदारांच्या नियुक्त्या करू नका’, असे निर्देश दिलेले नाहीत, तसेच नियुक्त्या करणार नसल्याचेही शासनाने म्हटलेले नाही. न्यायालयानेही या नियुक्त्यांना अंतरिम स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे शासनाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडण्यात आली.
दोन्ही पक्षांच्या भूमिका ऐकल्यावर न्यायालयाने शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला.