ढाका (बांगलादेश) – ढाक्याचे पोलीस महानिरीक्षक महंमद मोइनुल इस्लाम म्हणाले की, १ ऑक्टोबरपासून दुर्गा पूजा पंडालमध्ये ३५ अनुचित घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये ११ गुन्हे नोंदवण्यात आले असून २४ प्रकरणे सामान्य म्हणून नोंदवण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. या घटनांमध्ये सहभागी असलेल्या कुणालाही सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
Bangladesh Durga Puja Attacks: 🚨
So far, 35 Durga Puja pandals have been attacked by fanatic Mu$|!m$ in Bangladesh.👉 If even a single incident of attack had occurred during Mu$|!m festivals in India, the bigots would have taken to the streets and created an uproar.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
१. दुर्गापूजेच्या काही आठवड्यांपूर्वी इस्लामी गटांकडून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे धार्मिक गोष्टींचे सल्लागार ए.एफ्.एम्. खालिद हुसेन यांनी हिंदूंच्या सणाच्या वेळी धार्मिक सलोखा बिघडवणार्या किंवा प्रार्थनास्थळांना लक्ष्य करणार्यांविरुद्ध कठोर कारवाईची घोषणा केली होती.
२. एकीकडे आक्रमणे होत असतांना दुसरीकडे बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वॉकर-उझ-झामा, नौदलप्रमुख एम्. नजमुल हसन आणि वायूदलप्रमुख हसन महमूद खान यांनी ११ ऑक्टोबरला ढाका येथे रमना काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
३. देशाचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद सजीब भुईया यांनीही खुल्ना येथील गल्लामारी हरिचंद टागोर मंदिर आणि बागमारा गोविंदा मंदिरातील दुर्गा पूजा मंडळांमध्ये हिंदु समुदायाच्या सदस्यांसह जाऊद शुभेच्छा दिल्या.
४. १३ ऑक्टोबर या दिवशी देशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रा. महंमद युनूस ढाकेश्वरी मंदिराला भेट देणार आहेत.
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमानांच्या सणांच्या वेळी आक्रमण करण्याची एकजरी घटना घडली असती, तर देशात त्यांनी रस्त्यावर उतरून आकाशपाताळ एक केले असते आणि त्यांना ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्षांनी पाठीशी घातले असते ! |