उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके ।

देवीची विविध रुपे

ललिता त्रिपुरसुंदरी असे सकल विद्यादायिनी ।
हे सुरेश्वरी हे वागीश्वरी सकल ज्ञानदायिनी ।। १ ।।

ती आहे जगज्जननी परम कल्याणी ।
जीवनातील प्राणस्वरूप प्राणदायिनी ।। २ ।।

सुश्री. मधुरा भोसले

पापींचे पाप नष्ट करणारी पापमोचनी ।
पुण्याची वृद्धी करणारी परम पुण्यदायिनी ।। ३ ।।

कात्यायनऋषींची कन्या हे कात्यायनी ।
सांबसदाशिवाची प्रिय भार्या हे शिवानी ।। ४ ।।

हे ब्रह्मचर्यस्वरूप देवी ब्रह्मचारिणी ।
हे तपसाधना करणारी परम तपस्विनी ।। ५ ।।

हे आर्यादुर्गा तू दैत्य संहारिणी ।
हे विजयादुर्गा तू अष्टभुजाधारिणी ।। ६ ।।

हे शारदामाता तू ब्रह्मविलासिनी ।
हे वेदमाता तू चतुर्वेदधारिणी ।। ७ ।।

हे श्रीभुवनेश्वरी तू सकलभुवनधारिणी ।
हे त्रिभुवनसुंदरी तू सर्वजनवर्षिणी (टीप १)।। ८ ।।

हे राज राजेश्वरी तू सर्व ऐश्वर्यधारिणी ।
हे त्रिपुरसुंदरी तू सकल सिद्धिदायिनी ।। ९ ।।

हे सर्वमंत्रमयी तू सर्व वरदायिनी ।
हे मनाला मोहून टाकणारी तू मनमोहिनी ।। १० ।।

हे संपूर्ण जगाचे पालन करणारी जगत्कल्याणी ।
हे पतितांचा उद्धार करणारी परम पतितपावनी ।। ११ ।।

हे ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीदायिनी ।
हे सर्वप्रकारचे मंगल आणि शुभफलदायिनी ।। १२ ।।

हे जीवनदायिनी आणि हे धर्मअनुगामिनी (टीप २) ।
हे सर्व मुक्ती आणि श्रेष्ठतम मोक्षदायिनी ।। १३ ।।

हे अमृतकुंभ धारिणी आणि हे तेजोवर्धिनी ।
हे शक्तीदायिनी हे माते तू रणरागिणी ।। १४ ।।

मी आर्तभावाने करते तुला विनम्र याचना ।
उद्धार करावा हे माते त्रिपुरसुंदरी ललितांबिके।। १५ ।।

टीप १ – सर्व जनांवर कृपेचा वर्षाव करणारी

टीप २ – धर्माच्या मागे जाणारी

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक