‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (४८ व्या संत, वय ९१ वर्षे) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असून त्या रुग्णाईत आहेत. त्यांची भेट होण्यापूर्वी आम्ही काही संत आश्रमातील एका खोलीत बसलो होतो. तेव्हा तिथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यावर माझे मन पुष्कळ आनंदी झाले.
२. आम्ही बसलेली खोली पुष्कळ प्रकाशमान झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे तेज सर्वत्र पसरले होते.
३. त्या पुष्कळ भव्य वाटत होत्या.
४. त्यांच्या बोलण्यातील सहजता, नम्रता आणि प्रीती हे गुण मला अनुभवता आले.
५. माझा मुलगा श्री. अमित डगवार अकस्मात् तेथे एक निरोप देण्यासाठी आला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्याच्या कपड्यांविषयी सांगत होत्या. तेव्हा ‘जणू काही त्या अमितची अंतर्शुद्धी करत आहेत’, असे मला जाणवले.
६. आम्ही देवीच्या गाभार्यात बसलो असल्याप्रमाणे मला खोलीत शांतता जाणवली.
७. मला दैवी सुगंध आला.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ स्मितहास्य करत होत्या. त्या सर्वांकडे वात्सल्यभावाने पहात होत्या.
९. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना अनुभवतांना प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अनुभवत आहोत’, असे मला जाणवले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी गुरुदेवांसंबंधी एक आठवण सांगितली. तेव्हा ‘त्यांनी गुरुदेवांशी एकरूपता साधली आहे’, असे मला जाणवले.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा मला सत्संग लाभला’, याबद्दल माझे मन कृतज्ञतेने भरून आले. माझ्याकडून देवाला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे तू आम्हाला घडव’, अशी प्रार्थना होत होती. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अनमोल प्रीती आणि वात्सल्यभाव मला अनुभवता आला’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (११९ व्या संत, वय ६० वर्षे), फोंडा, गोवा. (२२.६.२०२४)
|