बीजगणितामध्ये उदाहरण सोडवतांना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे, हे आपल्याला कळत नाही; पण तो घेतल्याखेरीज चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल, त्या वेळी आपल्याला कळेल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज