|
नवी देहली – वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीला अनुमाने १ कोटी २५ लाख अभिप्राय प्राप्त झाल्यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या अभिप्रायांच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था, झाकीर नाईक, आय.एस्.आय. आणि चीन यांची भूमिका असू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याविषयी खासदार दुबे यांनी संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष श्री. जगदंबिका पाल यांना पत्र लिहिले आहे. खासदार निशिकांत दुबे हेदेखील संसदीय समितीचे सदस्य आहेत.
खासदार दुबे यांनी या पत्रात म्हटले आहे की, या अभिप्रायांच्या भौगोलिक उत्पत्तीकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. एकट्या भारतातून एवढ्या मोठ्या प्रमाणात अभिप्राय मिळणे जवळपास अशक्य आहे, असा दावा त्यांनी केला.
संपादकीय भूमिकाभाजपच्या खासदाराला जे वाटते, ते संसदीय समितीला स्वतःला का वाटत नाही ? गुप्तचरांचे याकडे लक्ष आहे का ? |