(हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे छायाचित्र प्रसिद्ध करत नसून हिंदूंचे प्रबोधन करण्यासाठी हे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा हेतू आहे. – संपादक)
नागपूर – शहरातील जरीपटका येथील रुद्र गणेशोत्सव मंडळाने शास्त्रीय पद्धतीने गणेशमूर्तीची स्थापना न करता विडंबनात्मक गणेशमूर्तीची स्थापना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. यावर बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर रुद्र गणेशोत्सव मंडळाने क्षमा मागत विडंबनात्मक गणेशमूर्तीचे विसर्जन केले.
१. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी बजरंग दलाने पोलीस आयुक्तांसह नागपूर येथील गणेश मूर्तीकारांना एक निवेदन देत सर्वमान्य रूप असलेली श्री गणेशमूर्तीच सिद्ध करावी, तसेच गणेशोत्सव मंडळांनीही शास्त्रीय रूपातील गणेशमूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन केले होते.
२. त्याला मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांनीही चांगला प्रतिसाद दिला; मात्र जरीपटका येथील रुद्र गणेशोत्सव मंडळाने अर्धी माती, अर्धी पत्र्याची विडंबनात्मक गणेशमूर्तीची स्थापना केली.
३. याची माहिती मिळताच बजरंग दलाने मंडळाच्या पदाधिकार्यांची भेट घेत ही मूर्ती विसर्जित करण्याची विनंती केली; मात्र मंडळाने प्रारंभी आडमुठी भूमिका घेतल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
४. पोलिसांनी हस्तक्षेप करत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांची समजूत काढली. नंतर गणेशोत्सव मंडळाने लेखी क्षमायाचना करत मूर्ती विसर्जित केली.