
गौहत्ती (आसाम) : गौहत्ती येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटीच्या) संगणक विज्ञान शाखेच्या तिसर्या वर्षाचा विद्यार्थी ९ सप्टेंबर या दिवशी त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेला हा विद्यार्थी ब्रह्मपुत्रा वसतीगृहात रहात होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचे अन्वेषण चालू केले आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकार्याने सांगितले.
संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन
या विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच, त्याला न्याय मिळावा आणि आय.आय.टी. मध्ये शिकणार्यांना आवश्यक मानसिक साहाय्य मिळावे, या मागण्यांसाठी संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. या वेळी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांनी आरोप केला की, मृत विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त होता आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्याच्यावर उपचार चालू होते. तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. त्याने आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य आणखी बिघडले.
या वर्षभरात गौहत्ती येथील आयआयटीमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक