महंत रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या भेटीचे छायाचित्र ‘स्टेटस’ला ठेवल्याचा राग !
अहिल्यानगर – सरला बेटचे महंत रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या भेटीचे छायाचित्र सामाजिक माध्यमावर स्टेटसला ठेवल्याच्या रागातून एका युवकावर आक्रमण करण्यात आले. श्रीरामपूरमधील आर्.बी.एन्.बी. कॉलेजसमोर ही घटना घडली. प्रदीप विठेकर या विद्यार्थ्याने राणे आणि महंत रामगिरी महाराज यांच्या भेटीचे छायाचित्र स्टेटसला ठेवले होते. ते पाहून राग आलेल्या रिझवान शेख आणि त्याच्या ३ साथीदार यांनी प्रदीपवर आक्रमण केले. चॉपर आणि फायटरने त्याला मारहाण केली, तसेच बेल्टने गळा आवळण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार विठेकर याने दिली असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिका :उद्दाम धर्मांधाला कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |