जय जय गौरी पुत्र गणेश ।

जय जय गौरी पुत्र गणेश ।
बाल गणेशाच्या लीला विशेष ।। १ ।।

तुला भजती दिनेश
आणि सुरेश । (टीप १)
तू सर्व देवतांमध्ये
आहेस विशेष ।। २ ।।

कु. मधुरा भोसले

सर्व असुरांना वाटतो तुझा द्वेष ।
तुझ्या कृपेने नष्ट होतो
मनातील क्लेश ।। ३ ।।

तुझा भक्त आहे श्रीअनंत शेष ।
तुझ्या कृपेने नष्ट होतो अहंकाराचा लवलेश ।। ४ ।।

तू आहेस प्रथम पूज्य श्री प्रथमेश ।
तू आहेस विघ्नहर्ता श्री विघ्नेश  ।। ५ ।।

माता तुमची पार्वती आणि पिता महेश ।
तुम्ही गजमुख गजानन श्री गणेश ।। ६ ।।

तू मयुरावर स्वार झालेला श्री मयुरेश ।
तू त्रेतायुगातील अवतार असे श्री गणेश ।। ७ ।।

तू ज्ञानवंत प्रतिभासंपन्न ज्ञानेश ।
तू बुद्धीदाता ज्ञानस्वरूप श्री गणेश ।। ८ ।।

तू यज्ञस्वरूप महातेजस्वी यज्ञेश ।
तू ब्रह्मांडनायक ब्रह्मस्वरूप अखिलेश ।। ९ ।।

तू लांब सोंडेचा भृशुंडीगणेश । (टीप २)
तू प्रवाळद्वीपातील पूजनीय प्रवाळगणेश ।। १० ।। (टीप २)

तुझे सुंदर स्वरूप शर्माविघ्नेश । (टीप २)
तुझे अज्ञान दूर करणारे रूप विज्ञानगणेश ।। ११ ।। (टीप २)

तुझी प्रसिद्ध आहेत नावे द्वादश (टीप ३) ।
तू सर्व देवतांचा आहेस ईश ।। १२ ।।

गणेशचतुर्थीचा हा दिनविशेष ।
तुझ्या दर्शनाने येतो भक्तीचा आवेश ।। १३ ।।

तुझे सुंदर रूप, अलंकार आणि वेश ।
तुझे आराध्यदैवत आहे उमेश ।। १४ ।।

आम्हावर कृपा करावी, हे देवेश ।
आम्हाला तारून न्यावे, हे सर्वेश ।। १५ ।।

टीप १ – ‘दिनेश’ हे सूर्याचे आणि ‘सुरेश’ हे शिवाचे एक नाव आहे.

टीप २ – श्री गणेश पुराणातील २१ नावांपैकी एक नाव आहे.

टीप ३ – द्वादशनामस्तोत्रामध्ये वर्णन केलेली श्री गणपतीची प्रसिद्ध १२ नावे.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०२३ सकाळी ११.१०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक