
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(भाग ६)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/829713.html

‘तुम्ही शरिराने कृश असला, तरी व्यायाम केल्याने तुमचे वजन आणखी न्यून होईल, असे नाही. खरेतर अशा स्थितीत वजन वाढवण्यासाठी आणि शरिरातील स्नायू बळकट करण्यासाठी ‘व्यायाम करणे’, हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, तेव्हा स्नायूंचे वस्तूमान आणि शरिरातील एकूण शक्ती वाढते. यामध्ये शरिरातील अनावश्यक घटक न्यून होऊन स्नायूंची वाढ झाल्याने वजन वाढण्यास साहाय्य होऊ शकते. त्यासाठी व्यायामाची सांगड पोषक तत्त्वे पुरवणार्या संतुलित आहाराशी घालणे आवश्यक आहे. कृश व्यक्तींनी व्यायामाचा आरंभ वैद्य किंवा आहार तज्ञ यांचा सल्ला घेऊन केल्यास त्यांना अधिक लाभ होईल.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (११.८.२०२४)
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !