‘गुरुदेवांच्या कृपेने मला एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. परात्पर गुरु डॉक्टरांकडे पहातांना मला पुष्कळ चैतन्य आणि तेज जाणवत होते. त्यानंतर मला शांत वाटू लागले.
२. ‘गुरुदेवांचे चैतन्य माझ्या सहस्रारातून शरिरात प्रवेश करत आहे आणि सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवत होते.
३. ‘गुरुदेवांचा वरदहस्त साधकांच्या मस्तकावर आहे’, असे मी अनुभवत होते.’
– सौ. सत्यभामा प्रकाश जाधव, पलूस, जिल्हा सांगली.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |