सकल हिंदु समाजाचा अहिल्यानगर येथे मोर्चा !
अहिल्यानगर – रामगिरी महाराजांना धमक्या देणार्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुहित संरक्षक आहेत. बाकीच्यांचे हिंदुत्व हे ‘चायनीज मॉडेल’ आहे, हा देश हिंदूंचा असल्याने हिंदुहिताची भाषा केली जाणार आहे. मुसलमानांना जी काही मस्ती करायची ती बांगलादेश, पाकिस्तान येथे जाऊन करा, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले. सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांना धर्मांधांकडून येणार्या धमक्यांचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी १ सप्टेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा चालू झाला. या मोर्चाचा समारोप देहली गेट येथील सभेने झाला.
आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, महंतांचे समर्थन करणारे स्टेटस ठेवणार्यांना मारहाण होते. यासाठी हिंदूंचा दरारा आणि धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅली मार्गावरील मशिदी आणि दर्गे हे प्रशासनाकडून झाकून ठेवण्यात आले होते.
आमदार नितेश राणेंवर कारवाई करण्याची धर्मांधांची मागणी !
आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर येथील मोर्च्यात केलेल्या वक्त्यव्यामुळे पोलिसांनी राणे यांच्यासह रॅलीचे आयोजक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुसलमान समाजाने पोलीस अधीक्षकांकडे केली. राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आल्यानंतर मुसलमान समाजाच्या वतीने सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तसेच या सभेचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावरही नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. |