Bengaluru Terror Suspect Arrested : बेंगळुरू विमानतळावर आतंकवाद्याला अटक

अजीज अहमद

बेंगळुरू – येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्आयए’च्या) अधिकार्‍यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.

तो साऊदी अरेबियाला पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती ‘एन्आयए’ला दिली. या माहितीच्या आधारे  ‘एन्आयए’च्या अधिकार्‍यांनी अहमदला केंपेगौडा विमानतळावरून अटक केली.