अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) चरणसेवा ।

साधकांची प्रज्ञा जागृत करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत असतांना श्री गुरूंच्या कृपेने भावस्थिती अनुभवली आणि त्यांनीच ही कविता लिहूनही घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सत्व-रज असे तव (टीप) सगुण रूप ।
गुणमय असूनही तू असे गुणातीत ।। १ ।।

नामानुसंधानातून तव सूक्ष्म रूप अनुभवाया देशी ।
नामातीत करूनी एकरूप करविसी अन् अद्वैत भाव विरविशी ।। २ ।।

कृपा तुझी होता, सर्व पापे हरती ।
शरण तुज जाता जीवन उद्धरसी ।। ३ ।।

श्री. प्रणव मणेरीकर

अनन्य भक्ता मार्ग तू दाविसी ।
मायेतील ब्रह्म ओळखण्या, मायापती तू म्हणविसी ।। ४ ।।

द्वैतभावातूनी गुरुभक्ती अन् ईश्वरभक्ती शिकविसी ।
अद्वैतभावातूनी आत्मसाक्षात्कार तो घडविसी ।। ५ ।।

कसे ओळखू हे सारे । तव कृपेविण व्यर्थ आहे सारे ।। ६ ।।

कृपा करूनी ठेवा मज तव चरणांशी ।
होता अपराध मजकडून, क्षमा तू करसी ।। ७ ।।

अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव चरणसेवा ।
तव प्राप्तीविण नको कशाचीही आस ।। ८ ।।

कृतज्ञता ! कृतज्ञता ! कृतज्ञता !’

टीप – तव : परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्रीकृष्णसेवक,

श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र (२३.३.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक