१. ‘निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी बिंदूदाबनाचे उपचार करण्यासाठी पुणे येथे आले होते. त्यांच्याकडे बघून मला आनंद जाणवत होता.
२. त्या सेवेतील सहसाधिकांमध्ये मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु स्वाती खाडये यांचे दर्शन झाले. त्या वेळी मला गार वार्याची झुळूक जाणवली.
३. श्री. जोशी माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना ‘त्यांचा हात म्हणजे गुरुदेवांचा हात आहे’, असे मला जाणवले. त्यांनी उपचार केल्यावर माझे पोट दुखायचे थांबले.
४. श्री. जोशी यांनी मला नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या ठिकाणी मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे रूप दिसले.’
– (पू.) सौ. संगीता महादेव पाटील, भोसरी, जिल्हा पुणे. (१४.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |