कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार जी.एस्. पाटील यांचे चिथावणीखोर विधान
गदग (कर्नाटक) – बांगलादेशामध्ये लोकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून जसा आक्रोश केला, तसा आपल्या देशातही पंतप्रधानांच्या घरात घुसण्याचे दिवस दूर नाहीत, असे चिथावणीखोर विधान करून काँग्रेस आमदार जी.एस्. पाटील यांनी केले. गजेंद्रगडमध्ये आयोजित अहिंद संमेलनात ते बोलत होते.
It won’t be long before people storm into PM Modi’s house, just like in Bangladesh – Karnataka Congress MLA, GS Patil
Earlier Congress MLC Ivan D’Souza had given a similar controversial statement against the Governor
Congressmen are making such statements because they expect… pic.twitter.com/B4DGBQ6xpg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 29, 2024
पाटील पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवून संघर्ष केला पाहिजे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे नेते यांच्या विरोधात भाजप षड्यंत्र रचत आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसवाल्यांना भारत अस्थिर असणे अपेक्षित असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्याची आवश्यकता आहे ! |