२४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याच्या गाडीवर केला गोळीबार
कोलकाता (बंगाल) – येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या विरोधात देशभरात डॉक्टर आंदोलने करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन बंगाल(Bengal) राज्यात या विरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. याला ‘नबन्ना अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. अशातच २८ ऑगस्टला भाजपकडून(BJP) ‘बंगाल बंद’ची हाक देण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते करत असलेल्या आंदोलनाला तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यकर्त्यांनी हिंसक विरोध केल्यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. २४ परगणा येथे तृणमूलच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार केला. यात भाजपचा एका कार्यकर्ता घायाळ झाल्याचेही वृत्त आहे. कोलकात्यात बंदच्या कालावधीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
१. उत्तर दिनाजपूरमध्ये जाळपोळ झाल्याचे समोर आले. मुर्शिदाबादमध्ये भाजपच्या समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचेही सांगितले जात आहे.
२. बंदच्या वेळी भाजपच्या सहस्रावधी कार्यकर्त्यांनी नागरिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी ‘मेट्रो’ आणि ‘मॉल’ (मोठे व्यापारी संकुल) बंद करण्याचाही प्रयत्न झाला.
३. पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतल्याचेही सांगितले जात आहे.
(म्हणे) ‘… तर देहलीला जाळण्यात येईल !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रघातकी विधान !लक्षात ठेवा, जर बंगालला जाळले, तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि देहली यांनाही जाळण्यात येईल, अशी धमकी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee)यांनी ‘कोलकाता बंद’ची हाक देत आंदोलन करणार्या भाजपला उद्देशून दिली आहे. यावर भाजपचे बंगाल अध्यक्ष सुकांत मजूमदार(Sukant Majumdar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मुख्यमंत्रीसारख्या एका मोठ्या घटनात्मक पदावर असलेल्यांकडून अशी राष्ट्रविरोधी विधाने केली जाणे निषेधार्ह आहे. तसेच हे विधान म्हणजे राज्यातील सर्वांत वरिष्ठ कार्यालयाकडून सूडाच्या राजकारणाला स्पष्ट पाठिंबा देण्यासारखेच आहे. आपण या गंभीर प्रकरणात लक्ष घालून कृपया योग्य ती कारवाई करावी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती करतो. |
(म्हणे) ‘बंदच्या दिवशी सरकारी कर्मचार्यांनी सुटी घेतल्यास कठोर कारवाई करू !’ – मुख्यमंत्री बॅनर्जीयाआधी भाजपने पुकारलेल्या बंदला तृणमूल काँग्रेसने विरोध केला होता. ‘या कालावधीत सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे चालू रहातील’, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले. तसेच जे सरकारी कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही बॅनर्जी यांनी दिली आहे. (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दडपशाही ! – संपादक) |
संपादकीय भूमिकागुंड, आतंकवादी, कट्टरतावादी, बलात्कारी यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेससारख्या राजकीय पक्षाकडून अशा प्रकारे प्रतिक्रिया उमटणे यात काय आश्चर्य ? |