भारत हा एकमेव असा देश आहे, ज्याला अमेरिका आणि रशिया दोघेही संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) पुरवतात. आता भारतात पहिल्यांदाच होणार अमेरिकन ‘जेट इंजिन’ची निर्मिती ! जगातील मोजक्या देशांसमवेत अमेरिका करतो ‘जेट इंजिन’चे सह-उत्पादन. भारतात उत्पादन करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने दिली विशेष अनुमती !
जेट इंजिनचे संवेदनशील तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित होणार. याखेरीज अमेरिका भारताला देणार आण्विक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करू शकणारे ड्रोन, ‘अँटी सबमरीन’ (पाणबुडीविरोधी) यंत्रणा. यातून अमेरिकेसाठी भारताची अपरिहार्यता व्यक्त होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. या दौर्याच्या वेळी महत्त्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे. (२६.८.२०२४)
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)