|
छत्रपती संभाजीनगर – आधुनिक वैद्या प्रतीक्षा गवारे हिने आधुनिक वैद्य पतीच्या संशयखोर वृत्तीला कंटाळून २४ ॲागस्ट या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रतीक्षा हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आधुनिक वैद्य प्रीतम शंकर गवारे यांच्या विरोधात २५ ऑगस्ट या दिवशी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आधुनिक वैद्या प्रतीक्षा यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर नातेवाईक येण्यापूर्वीच आरोपी आधुनिक वैद्य प्रीतम पसार झाले. आरोपी प्रीतम हा प्रतीक्षा यांच्या भ्रमणभाषवर येणार्या संदेशांवरून तिच्याशी वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, तसेच भ्रमणभाषसंच पालटण्यावरून दोघांत वाद झाले होते.