यवतमाळ येथे सहस्रोंच्या संख्येत सकल हिंदू मूक मोर्चा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकरण

यवतमाळ, २५ ऑगस्ट (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ ऑगस्ट या दिवशी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात बंद पुकारून मूक मोर्चा काढण्यात आला.

यवतमाळ ऑटो युनियन, कामगार युनियन, मोक्षधाम सेवा समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, व्यापारी संघटना, साई पॉइंट चालक-मालक संघटना, शिक्षक महासंघ, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना, शिवप्रतिष्ठान, किराणा मर्चंट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, शहरातील समस्त दुर्गा उत्सव आणि  गणेशोत्सव मंडळे, इस्कॉन परिवार अशा अनेक संघटनांनी यात सहभाग घेतला.

यवतमाळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी ११ वाजता भर पावसात सहस्रोंच्या संख्येत हिंदु मुली, महिला, पुरुष एकत्र येऊन विशाल मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील विविध भागांतून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोचला.

पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री राम लोखंडे, अजय मुंदडा, राजेश्वर निवल यांनी त्यांच्या आवाहन केले की, आता हिंदू अत्याचार सहन करणार नाहीत !