भाजपच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील !

नाथाजी पाटील (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना चंद्रकांत पाटील (डावीकडे) आणि चंद्रशेखर बावनकुळे (उजवीकडे)

कोल्हापूर – भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी त्यागपत्र दिल्यामुळे त्यांच्या जागी भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नाथाजी पाटील यांना त्यांच्या निवडीचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात २१ ऑगस्टला दिले. या संदर्भात नाथाजी पाटील म्हणाले, ‘‘गेली २७ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केल्याची ही पोचपावती आहे. यापुढे पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू.’’