यादगीर (कर्नाटक) येथे ख्रिस्ती महिलांकडून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

यादगीर (कर्नाटक) – यादगीर जिल्ह्यातील लक्ष्मीनगरात बेंगळुरूच्या दोन ख्रिस्ती महिलांनी हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटली आणि हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदु देवतांविषयी कटू आणि घृणास्पद शब्द वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिकांनी त्या ख्रिस्ती महिलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. आरोपी महिलांची नावे रेचेल रॉबर्ट आणि करुणा अशी आहेत.

‘पृथ्वीवर कुणी देव असेल, तर तो एकच आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. तुमचे देव तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाहीत. तुमचा हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारा’, असे सांगत या ख्रिस्ती महिलांनी हिंदूंच्या घरी जाऊन बलपूर्वक धर्मांतरासाठी त्यांना प्रवृत्त केले, असे लक्ष्मीनगरच्या रहिवाशांनी यादगीर शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • कर्नाटकमध्ये काँग्रेसची राजवट असल्याने अशांविरुद्ध कारवाई होईल, अशी अपेक्षा करता येत नाही. यासाठी आता हिंदूंनीच संघटित झाले पाहिजे !
  • हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे, हाच धर्मांतर रोखण्याचा प्रभावी उपाय आहे !