नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आताही आहे आणि आपण गेल्यावरही ते रहाणार आहे. सृष्टीचा लय झाला, तरी ते शिल्लक रहाणारच. नाम म्हणजे ईश्वर होय.
नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्तीही अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती अधिक असते, ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते, तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तीमान, अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : ‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे-आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)