‘हिंदू रक्षा समिती दोडामार्ग’ (जिल्हा सिंधुदुर्ग) संघटनेने १४ ऑगस्टला येथील ‘महाराजा हॉल’मध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये भारतमाता की जय, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दत्त संप्रदाय, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग होता. या बैठकीत लव्ह जिहाद, भूमी जिहाद, थूक जिहाद, तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे यांविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी ‘भारतमाता की जय’ संघटनेचे पदाधिकारी तथा दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. गणेश गावडे यांनी उपस्थितांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगितले, तसेच ‘इतर दैनिकांपेक्षा दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यायोग्य आहे. या दैनिकात नेहमी निर्भीडपणे बातम्या दिल्या जातात’, असे सांगून दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचे आवाहन उपस्थितांना केले.