ढाका – भारतीय उपखंडात सक्रीय असलेल्या ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेने बांगलादेशातील लोकांसाठी १२ पानांचा संदेश प्रसारित केला आहे. यामध्ये ‘अल् कायदा’ने शेख हसीना यांची हकालपट्टी ही ‘जनक्रांती’ असल्याचे म्हटले आहे. भारताचे ‘गुलाम’ असलेले हसीना यांचे सरकार हटवल्याविषयी ‘अल् कायदा’ने बांगलादेशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या संदेशात ‘अल् कायदा’ने बांगलादेशमध्ये इस्लामी सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. बांगलादेशच्या नव्या सरकारने प्रशासनात इस्लामी नियमांची काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे ‘अल् कायदा’ने म्हटले आहे.
‘Al Qaeda’ Bangladesh: ‘Al Qaeda’ hopes that Bangladesh will become an Islamic regime !
It would be wise for India to be declared as a Hindu Rashtra at the earliest. Only then can Jihadists, fanatics and terrorists be given a proper response !#BangladeshCrisis… pic.twitter.com/gSXC9KMBLR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 12, 2024
१. ‘अल् कायदा’ने त्याच्या संदेशात बांगलादेशी जनतेला या क्रांतीत सहभागी असलेल्या सैन्यदलावर विश्वास ठेवू नये, अशी चेतावणी दिला आहे. ही क्रांती यशस्वी होण्यासाठी सैन्यदलाचे नेतृत्व हटवले पाहिजे, असे ‘अल् कायदा’ने म्हटले आहे.
२. बांगलादेशाच्या सैन्यदल प्रमुखांनीच शेख हसीना यांना सैन्यदलाच्या विमानातून भारतात नेले, असे ‘अल् कायदा’ने म्हटले आहे.
३. अल् कायद्याने दिलेल्या या संदेशाविषयी ‘साहब मीडिया’ने लेख लिहिला आहे. या लेखात ‘अल् कायदा’च्या कारवायांमुळे दक्षिण आशियातील चालू राजकीय घडामोडींवर परिणाम होऊ शकतो’, असे म्हटले आहे.
४. इस्लामी शक्तींनी बांगलादेशामध्ये शरीयत कायदा पूर्णपणे लागू करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ‘अल् कायदा’ त्याच्या संदेशात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रातच जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचा योग्य तो समाचार घेतला जाईल ! |