लोणी काळभोर येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या रिक्शाचालकावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) – शाळेला जाण्यासाठी वाहनाची वाट पहाणार्‍या १४ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या विजय जाधव या रिक्शाचालकावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलगी ६ ऑगस्टला सकाळी लोणी काळभोर येथील शाळेला जाण्यासाठी घरातून निघाली होती. ती पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहनाची वाट पहात होती. तेव्हा ओळख असणारा आरोपी रिक्शाचालक विजय जाधव याने ‘तुझी आई माझ्या घरी आहे’, असे म्हणून पीडित मुलीस स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर रिक्शाचालक विजय जाधव हा तेथून पळून गेला. (मुलींच्या विनयभंगाच्या घटना वारंवार होणे हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)