जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वेद यांचा दावा !
जम्मू – जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वेद यांच्या मते, पाकिस्तान पुन्हा एकदा कारगिल युद्धासारखा कट रचत आहे. काश्मीर खोर्यातील वाढत्या आतंकवादी आक्रमणांमागे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आदिल रहमानी आहेत. आदिल रहमानी यांच्या देखरेखीखाली ‘स्पेशल सर्व्हिस ग्रुप’चे (‘एस्.एस्.जी.’चे) सुमारे ६०० कमांडो यासाठी सिद्ध करण्यात आले आहेत. हे कमांडो उच्च प्रशिक्षित आहेत आणि त्यांपैकी अनेकांनी भारतात प्रवेशही केला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांमध्ये याच गटाचा हात आहे.
Correction:
Former D.G. of Police of J&K, S.P. Vaid— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 1, 2024
वेद यांनी सांगितले की, घुसखोरी केलेल्या कमांडोंना खोर्यातील सक्रिय स्थानिक लोक परिसराची माहिती आणि आवश्यक साहाय्य करत आहेत. (काश्मीर खोर्यातील संबंधित स्थानिकांना शोधून काढून फासावर लटकवण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया संवेदनशील भारतीय, तसेच भारतीय सैनिक यांनी व्यक्त केली, तर आश्चर्य वाटायला नको ! – संपादक) त्यांचा भारतीय सैन्याच्या ‘१५ कोर’ आणि ‘१६ कोर’ या तुकडींवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. याखेरीज या गटाच्या आणखी २ बटालियन (२ सहस्र सैनिक) सज्ज आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ? |

केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !