बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली येथे हिंदु मुलांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्या तिघा ख्रिस्त्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. प्रेम जयल, विनोद उपाध्याय आणि नितीन, अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही आरोपी येथे एका भाड्याच्या घरात रहात होते. आरोपी हिंदु मुलांना फूस लावून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचे. या प्रकरणात आरोपींना बाहेरून निधी मिळत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
१. आरोपी हिंदु मुलांना त्यांच्या घरी बोलावून त्यांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देत होते आणि त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचे आमीष दाखवत होते. ते मुलांना ख्रिस्ती धर्माशी संबंधित गोष्टी असलेले ‘नीतीशास्त्र’ नावाचे पुस्तक वाचण्यास भाग पाडत होते.
२. पोलिसांनी आरोपींच्या घरावर धाड घातली असता त्यांना तेथे अनेक लहान मुले आढळून आली. या वेळी पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना अटक केली आणि पीडित मुलांना त्यांच्या घरी पोचवले.
३. मूळ हिंदु असलेल्या या आरोपींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि आता ते ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. या तिघांनीही अनेकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. ते मुख्यत्वे लहान मुले आणि महिला यांना त्यांच्या प्रार्थनासभेत बोलावत असत अन् त्यांना खाद्यपदार्थ देऊन त्यांचे धर्मांतर करत असत.
४. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात बलपूर्वक धर्मांतर घडवून आणल्याच्या प्रकरणी विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हिंदु संघटनांनीही या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका‘एका हिंदु व्यक्तीने धर्मांतर केल्यास केवळ एक हिंदु अल्प होत नाही, तर एक शत्रू वाढतो’, याची प्रचीती देणारी ही घटना आहे. ‘बाटगे हिंदु जास्त कडवे असतात आणि ते हिंदु धर्माच्या मुळावरच उठतात’, हे यावरून दिसून येते ! |