
मुंबई – शहरातील पूर्व उपनगरामध्ये १० वर्षीय मुलीवर तिच्या बहिणीच्या पतीने बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगी ठाणे येथे रहाणारी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी पीडित मुलीची आई मुलीला घेऊन मुंबईतील पूर्व उपनगरातील तिच्या बहिणीकडे गेली होती. या वेळी घरात कुणी नसतांना बहिणीच्या पतीने मुलीवर अत्याचार केले. या वेळी घाबरलेल्या पीडित मुलीने याविषयी कुणाकडे वाच्यता केली नाही. यानंतर पीडित मुलीला घेऊन महिला पुन्हा ठाणे येथे स्वत:च्या घरी गेली.
२८ जुलै या दिवशी मुंबईतील बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला पीडित मुलीच्या आईला बोलावले असता पीडित मुलीने तेथे जाण्यास नकार दिला. त्या वेळी पीडित मुलगी घाबरली. या वेळी पालकांनी विचारणा केली असता मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती पालकांना दिली. यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार केली. अल्पवयीन मुलीची वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे.
संपादकीय भूमिका :समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम ! |
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद