
मुंबई, २८ जून (वार्ता.) – अन्नपदार्थांमधील विषशोधक आणि कीटकनाशक यांचे अंश अन् आरोग्यासाठी अपायकारक घटक यांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘अतीसंवेदनशील उपकरणे’ खरेदी करण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला अपयश आले आहे. मुंबईतील पायधुनी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या चौकशीतून यंत्रणेची अनास्था आणि गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देतांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली. या संदर्भात आमदार डॉ. (श्रीमती) मनीषा कायंदे, भाई जगताप, सतेज उपाख्य बंटी पाटील, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे आणि सुधाकर अडबाले यांनी हा प्रश्न विचारला होता.
निविदेला प्रतिसाद नसल्याने खरेदी रखडली !
अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये सध्या ‘हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी’ (द्रवरूप मिश्रणामधील घटक आणि रासायनिक पदार्थ वेगळे करून माहिती देणारे उपकरण) आणि ‘जीसी’ (गॅस क्रोमॅटोग्राफी – रासायनिक प्रयोगशाळेतील प्रगत विश्लेषण पद्धती) यांसारखी उपकरणे उपलब्ध असली, तरी अतिशय सूक्ष्म आणि संवेदनशील पडताळणीसाठी लागणारी सर्वांत प्रगत, अत्यंत अचूक आणि उच्च दर्जाची साधने उपलब्ध नाहीत. केंद्र सरकारच्या ‘अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकटीकरण योजने’अंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये प्रस्ताव प्राप्त होऊन जानेवारी २०२६ मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली; परंतु निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही आवश्यक उपकरणे खरेदीच होऊ शकली नाहीत. परिणामी असे महत्त्वाचे नमुने पडताळणीसाठी बाहेरील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठवावे लागत आहेत.
नवीन वर्षात २ कोटी ७ लाख ३० सहस्र रुपयांचे प्रावधान !
या संवेदनशील उपकरणांच्या खरेदीसाठी वर्ष २०२६-२७ च्या सामंजस्य करारामध्ये २ कोटी ७ लाख ३० सहस्र रुपयांच्या निधीचे प्रावधान प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्रशासनाच्या संमतीच्या अधीन राहून ही उपकरणे लवकरात लवकर खरेदी करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे; मात्र तोपर्यंत जनतेच्या आरोग्याची सुरक्षा खासगी प्रयोगशाळांच्या भरवशावरच रहाणार का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain