राज्याच्या गृह विभागाच्या अहवालातील माहिती

बेंगळुरू/मैसुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्य गृह विभागाने बांगलादेशी घुसखोरांची सूची सिद्ध केली आहे. त्यानुसार सरकारला राज्यात एकूण १३ सहस्र ६७५ घुसखोर असल्याचे आढळून आले. राजधानी बेंगळुरूत सर्वाधिक, म्हणजे १० सहस्र ६५० घुसखोर वास्तव्यास आहेत. त्या पाठोपाठ मैसुरू (८१०), बेळगाव (४५८), दक्षिण कन्नड (२६८) आणि रामनगर (१९१) या जिल्ह्यांत अधिक प्रमाणात घुसखोर असल्याची माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. यासह अन्यही जिल्ह्यांमध्ये घुसखोर वास्तव्यास आहेत.
मैसुरूत बांगलादेशी घुसखोर येत असल्याची अफवा पसरल्यानंतर मैसुरू रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत. बंगालहून आलेल्या हावडा एक्स्प्रेसमध्ये पडताळणी करण्यात आली. यापूर्वी बंगालहून आलेल्या लोकांना बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप केल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. तथापि कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी त्यांपैकी एकही बांगलादेशी घुसखोर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अफवांना आळा घालण्यासाठी या वेळी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून पडताळणी करण्याचे पाऊल उचलले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती बांगलादेशी घुसखोर ?
१. बळ्ळारी : ५३
२. चिक्कबळ्ळापूर : ३८
३. हुब्बळ्ळी/धारवाड : ३५
४. मांड्या : ३७
५. दावणगेरे : २०
६. रायचुरू : १९
७. कोलार : १३
८. कोडगु : १०
९. कोप्पळ : १०
१०. कलबुर्गी : ९
११. चित्रदुर्ग : ८
१२. हासन : ५
१३. चामराजनगर : ३
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !