आतंकवाद्यांनी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि अमानुष छळ केल्यानंतर गोळ्या झाडून केल्या होत्या हत्या !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील अनंतनाग येथील हिंदु परिचारिका सरला भट यांचे ३६ वर्षांपूर्वी झालेले अपहरण, सामूहिक बलात्कार, अमानुष छळ आणि नंतर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी काश्मीर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७३७ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. या कृत्यात ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा (‘जेकेएलएफ्’चा) प्रमुख असणारा आतंकवादी यासीन मलिक हाही आरोपी आहे.
Chargesheet Filed Against Terrorists 36 Years After the Murder of Sarla Bhatt in Kashmir
The terrorists had abducted her, subjected her to gang rape and inhuman torture, and then shot her dead.
This is a matter of shame for India and for successive governments of all political… pic.twitter.com/GcDCfhNbBw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 29, 2026
यासिन मलिक सध्या दुसर्या एका प्रकरणात देहलीतील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, तर अन्य ४ आरोपींचा मृत्यू झाला आहे. खुर्शीद अहमद चालकू हा पसार असून तो पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते.
‘जेकेएलएफ’च्या आतंकवाद्यांनी १८ एप्रिल १९९० या दिवशी ‘शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’जवळून सरला भट यांचे अपहरण केले होते. आतंकवाद्यांनी त्यांना ‘पोलिसांची खबरी’ म्हणजे ‘पोलिसांना माहिती देणारी’, ठरवले होते. काश्मीरमधील परिस्थिती सध्या सामान्य झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण चालू करून पुरावे गोळा केले आणि आरोपपत्र प्रविष्ट केले.
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार