छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !

जोगेंद्र सैनी आणि अलीशा खातून

रामपूर (उत्तरप्रदेश) – छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अलीशा खातून नावाच्या मुसलमान तरुणीने रामपूर (उत्तरप्रदेश) येथील जोगेंद्र सैनी नावाच्या हिंदु तरुणासोबत विवाह कला. लग्नानंतर अलीशाने स्वतःच्या इच्छेने तिचे नाव पालटून ‘अदिती’ ठेवले आहे. अलीशाच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला; परंतु मुलगी सज्ञान असल्याने पोलिसांनी तिच्या इच्छेचा आदर केला.

१. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार रामपूर येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय जोगेंद्र सैनी याची दीड वर्षांपूर्वी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अलीशा खातूनशी ओळख झाली होती. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी अलीशा खातून अनुमाने १ सहस्र किलोमीटर दूर रामपूरला जोगेंद्रकडे निघून आली.

२. अलीशाची आई परवीन बेगम आणि भाऊ महंमद समीर हे देखील तिचा शोध घेत छत्तीसगड पोलिसांसह रामपूरला पोचले.

३. हे प्रकरण रामपूर पोलिसांपर्यंत पोचले. पोलिसांनी मुलगी सज्ञान असल्याची खात्री केली आणि तिचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर विश्व हिंदु परिषदेने २७ जून या दिवशी जोगेंद्र आणि अलीशा यांचा शिवमंदिरात विवाह लावून दिला.