Pakistani Soldiers Loot POK :  पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !

परिसरात पाकिस्तान सरकार आणि सैन्यदल यांच्या विरोधात आंदोलन चालूच


इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार आणि सैन्यदल यांच्या विरोधात लोकांचा संताप सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या २० दिवसांपासून अनेक भागांत सहस्रावधी लोक रस्त्यावर उतरले आहेत. याच कालावधीत पाकिस्तानच्या सुरक्षादलाचे सैनिक (पाकिस्तानी रेंजर्स) रावलकोट येथील एका पेट्रोलपंपाच्या ठिकाणी पोचले. त्यांनी तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर आक्रमण केले. पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांना धमकावून सैनिकांनी इंधन (पेट्रोल/डिझेल) आणि ३ लाख पाकिस्तानी रुपये लुटून नेले. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

१. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार पाकव्याप्त काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत अनुमाने ७० सहस्र निदर्शक पाकिस्तान सरकार आणि सैन्यदल यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. निदर्शकांचे म्हणणे आहे की, ते महागाई, बेरोजगारी, विजेचे संकट, प्रशासकीय भ्रष्टाचार आणि सैन्यदलाचा अत्याचार यांमुळे त्रस्त झाले आहेत.

२. पाकव्याप्त काश्मीरमधील वाढता जनक्षोभ पाकिस्तान सरकारसाठी मोठे आव्हान ठरत आहे. लोकांचे सातत्याने चालू असलेले विरोध प्रदर्शन हे दर्शवते की, स्थानिक जनतेमधील असंतोष अधिक गडद होत चालला आहे.

संपादकीय भूमिका

लुटारू सैनिकांचा भरणा असलेले पाकिस्तानी सुरक्षादल !