Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्‍या २ मुसलमान बहिणींना गावकर्‍यांनी पकडले

पकडण्याच्या भीतीने गोमांस कालव्यात फेकले आणि गावकर्‍यांवर केली दगडफेक

गो-तस्करी करणार्‍या २ मुसलमान बहिणी

रीवा (मध्यप्रदेश) – मुस्कान खान आणि रुबिया खान या २ मुसलमान बहिणींना गोमांसाची तस्करी करतांना लोही गावकर्‍यांनी रंगेहात पकडले. गावकर्‍यांनी त्यांना घेरले असल्याचे लक्षात येतात त्यांनी गोमांसाने भरलेली पिशवी येथील कालव्यात फेकून दिली. तसेच त्यांनी गावकर्‍यांवर दगडफेक केली. यात हिंदु संघटनेचे कार्यकर्ते असणारे शेतकरी आनंद सिंह बघेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथे पोचलेल्या पोलिसांनी या दोघींनाही अटक केली. पोलिसांनी गावकर्‍यांच्या साहाय्याने कालव्यातून गोमांस बाहेर काढले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत (लॅब) पाठवले आहे. ‘जप्त करण्यात आलेल्या मांसाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले.

लोही गावातील लोकांना गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही बहिणींवर गो-तस्करीचा संशय होता. म्हणूनच गावकर्‍यांनी या बहिणींचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही बहिणी थांबल्या नाहीत आणि त्यांची दुचाकी वेगाने पळवू लागल्या होत्या.

संपादकीय भूमिका

गोमांस तस्करीत आता मुसलमान महिलाही मागे नाहीत, हेच ही घटना दर्शवते !