‘जिहाद अल् अकबर’ या ऑनलाईन कटाच्या माध्यमातून हिंदु महिलांना लक्ष्य !
हिंदु मुलींना जाळ्यात ओढा, निकाह आधी गरोदर करा आणि मूल कह्यात घ्या, असा आदेश !

कोटा (राजस्थान) – येथे धर्मांतर आणि महिलांचे लैंगिक शोषण याविषयीचे एक प्रकरण समोर आले आहे. बजरंग दलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी मनीष शर्मा उपाख्य मोईन खान याला अटक केली आहे. आरोपीकडे हिंदु मुली आणि महिला यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत.
१. पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणा यांना मोईन खानच्या भ्रमणभाषमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या ३ गुप्त ‘ऑडिओ क्लिप्स’ सापडल्या आहेत. यानंतर पाकिस्तानमधून नियंत्रित ‘जिहाद अल् अकबर’ नावाचा एक धोकादायक ऑनलाईन कट समोर आला आहे. ऑडिओमधील पाकिस्तानी व्यक्ती दावा करते की, ते लोक ही ऑनलाईन मोहीम वर्ष १९९२ पासून राबवत आहेत.
२. ही मोहीम चालवणारे पाकिस्तानचे कट्टरपंथी जिहादी प्रमुख स्वत: कधीही थेट समोर येत नाहीत. ते त्यांच्या भारतातील दलालांना टेलिग्राम, स्नॅपचॅट आणि डिस्कॉर्ड यांसारख्या सामाजिक माध्यमांतून सूचना देतात. यासाठी रीतसर गुप्त गट बनवण्यात आले आहेत.
३. या कटाचा मुख्य उद्देश भारतात हिंदु महिलांचे सक्तीने धर्मांतर करणे आणि ईशनिंदा (श्रद्धास्थानांचा अपमान) घडवून आणणे, हा आहे. याद्वारे भारतातील हिंदूंच्या मनात हिंदु धर्माविषयी द्वेषाची बीज पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४. या ऑडिओमध्ये पाकिस्तानी प्रमुख भारतातील ‘वकास’ नावाच्या एका मुसलमान तरुणाला समजावत आहे की, तुझ्या महाविद्यालयातील मुसलमान तरुणांना जागृत कर आणि त्यांच्यासमवेत गुप्त बैठका घे. या तरुणांना भडकवण्यासाठी सर्वांत आधी धार्मिक गोष्टी दाखवल्या आणि समजवल्या जातात. त्यानंतर त्यांना त्यांच्या गुप्त गटाविषयी सांगितले जाते. त्यांना हळूहळू आणि पद्धतशीरपणे पुढील काम करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.
५. या संपूर्ण कटाच्या अंतर्गत विवाहित हिंदु महिला आणि अल्पवयीन हिंदु मुली यांना प्रामुख्याने जाळ्यात ओढले जाते. या गुप्त गटात लिहिले आहे, ‘कुठल्याही हिंदु मुलीला किंवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढा, निकाहाच्या आधीच तिला गरोदर करा आणि ९ महिन्यांनंतर मूल स्वतःच्या कह्यात घ्या. मूल जन्माला आल्यानंतर ती हिंदु महिला मुसलमान बनलेली असेल.’
६. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष शर्मा हा मूळचा हिंदु होता, नंतर धर्मांतर करून त्याने त्याचे नाव मोईन खान ठेवले होते. (यावरून ‘बाटगे अधिक कडवे असतात’, हे सिद्ध होते ! – संपादक) तो कोटा येथील विज्ञाननगरचा रहिवासी आहे. मोईन खान गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी संघटनांच्या संपर्कात होता.
७. बजरंग दलाचे कार्यकर्ते योगेश रेनवाल यांच्या तक्रारीवरून १५ जून २०२६ या दिवशी कोटा येथील विजयनगर आणि उद्योगनगर पोलीस ठाण्यात आरोपी मनीष शर्मा उपाख्य मोईन खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मोईन खानला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.
८. या प्रकरणी भाजपचे मंत्री मदन दिलावर यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !