विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !

पोलिसांकडून प्रकरण दडपले जात असल्याचा मृत युवकाच्या नातेवाइकांचा आरोप

सांगली – मूळचा सांगलीतील असलेला पुणे येथे नोकरी करणारा दुर्वांक शेवाळे हा १९ वर्षांचा हिंदु तरुण कोल्हापूच्या एका मुसलमान तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांनी विवाह करण्याचे ठरवले होते; मात्र मुसलमान तरुणीने विवाहासाठी ‘आमचा धर्म स्वीकारावा लागेल’, अशी अट त्याला घातली. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. त्यातूनच ‘दुर्वांकने आत्महत्या केली’, असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.

१. दुर्वांक काही दिवसांपूर्वी सांगलीत आला होता. त्याच्या घराजवळ रहाणार्‍या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक मुसलमान तरुणी अधून-मधून येत असते. ती त्या महिलेची नातेवाईक आहे. तरुणीची दुर्वांकशी ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

२. स्वतःच्या भ्रमणभाषमधील ‘बॅलन्स’ (पैसा) संपल्यामुळे दुर्वांकने त्याच्या आईच्या भ्रमणभाषवरून संबंधित तरुणीशी संपर्क साधला होता.

३. त्या दोघांमधील संभाषण पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अन्वेषण केलेले नाही. पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

४. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या नातेवाईकांनी अद्याप फिर्याद दिलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहाद करण्यात मुसलमान युवतीही मागे नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध होते !
  • सरकारने मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी करून त्यात दोषी आढळणार्‍या पोलिसांची नावे जनतेसमोर उघड केली पाहिजे !