Tamil Nadu Leaders Murder : तमिळनाडूत २४ तासांत तीन राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांची हत्‍या !

तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन

चेन्‍नई – तमिळनाडूमध्‍ये २४ तासांपेक्षा अल्‍प कालावधीत ३ वेगवेगळ्‍या राजकीय पक्षांच्‍या नेत्‍यांची हत्‍या करण्‍यात आली आहे. याविषयी विरोधकांनी राज्‍य सरकारला घेरले आहे. तमिळनाडूमध्‍ये अराजकतेचे वातावरण असून मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यास सक्षम नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधारी द्रमुकचे लोक अराजक पसरवत असून सरकारच्‍या दबावामुळे पोलीसही त्‍यांच्‍यावर कारवाई करत नाही, असा आरोप अण्‍णाद्रमुकने केला आहे.

१. अण्‍णाद्रमुकचे प्रवक्‍ते कोवई सत्‍यम् यांनी प्रसिद्ध केलेल्‍या एका निवेदनात म्‍हटले आहे की, तमिळनाडूमध्‍ये २४ तासांपेक्षा अल्‍प कालावधीत अण्‍णाद्रमुक पक्षाचा नेता, त्‍यानंतर भाजपचा नेता आणि नंतर काँग्रेसचा नेता यांची हत्‍या करण्‍यात आली आहे.

२. भाजपचे प्रवक्‍ते शेहजाद पूनावाला म्‍हणाले की, तमिळनाडूतील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेची स्‍थिती बिकट होत चालली आहे. जुलैच्‍या प्रारंभी बहुजन समाज पक्षाचे दलित नेते आर्मस्‍ट्राँग यांची निर्घृण हत्‍या करण्‍यात आली होती. आता सलग तीन हत्‍या झाल्‍या आहेत. यावरून राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन यांच्‍या नियंत्रणाबाहेर असल्‍याचे दिसून येते.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्‍या बंगालमध्‍ये ज्‍या प्रमाणे विरोधकांना वेचून ठार मारले जाते, तशीच स्‍थिती आता द्रमुक सत्तेवर असलेल्‍या तमिळनाडूत निर्माण झाली आहे. ही स्‍थिती कायदा आणि सुव्‍यवस्‍थेसाठी चिंताजनक !