मुंबई – कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुणे येथील प्रवाशांची गैरसोय झाली. डेक्कन क्वीन, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रहित करण्यात आल्या. २६ जुलै या दिवशी सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रहित करण्यात आल्या आहेत.
कल्याणमधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनी नदीच्या कडेला असणार्या २०० हून अधिक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.