ध्वनीप्रदूषणासंबंधींच्या तक्रारींवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली नाही ?

‘ध्वनीप्रदूषणासंबंधी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एकूण २२ तक्रारी नोंद झाल्या आहेत आणि यांपैकी १६ तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ६ प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलीस आणि संबंधित पंचायत यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकूण ४ तक्रारी आल्या आहेत आणि यांमधील ३ तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती गोव्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी गोवा विधानसभेत दिली.’ (२३.७.२०२४)