२६.५.२०२४ ला मी एका साधिकेच्या घरी असतांना तिच्या पतीने आम्हाला माहुर येथील श्री रेणुकादेवीचा प्रसाद दिला. श्री रेणुकादेवी आमची कुलदेवता आहे. वर्ष २०२२ मध्ये आम्ही (मी आणि सद्गुरु चारुदत्त पिंगळे) माहुरक्षेत्री गेलो होतो. तेव्हा आम्ही माहुरगडावर श्री रेणुकादेवीच्या मंदिराच्या आवारात एक लहान मंदिर पाहिले. ते मंदिर श्री महालक्ष्मीदेवीचे होते. हे मंदिर आम्हाला इतक्या वर्षांत कधीच दिसले नव्हते. त्या वेळी देवीने आम्हाला ‘श्री रेणुकादेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी (म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि चित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) एकच आहेत’, याची प्रचीती दिली. श्री रेणुकादेवीचा प्रसाद मिळाल्यावर मला त्या प्रसंगाचे स्मरण झाले आणि श्री महालक्ष्मी देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) या माझ्या समवेत आहेत’, याची मला निश्चिती झाली.
त्यानंतर गुरुदेवांच्या जन्मोत्सव काळातील नवचंडी यागाच्या तिसर्या दिवशी, म्हणजे २७.५.२०२४ या दिवशी श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) यांनी ‘हा चंडीयाग म्हणजे छोटे नवरात्रच आहे’, असे सांगितले. याचीच प्रचीती ‘श्री रेणुकादेवीने २६.५.२०२४ या दिवशी तिचा प्रसाद पाठवून आम्हाला दिली’, असे मला वाटले आणि देवीमातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
– सौ. मधुवंती पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (२.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |