नवी देहली – मुसलमान त्यांची ओळख लपवून हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजासाहित्याची विक्री करतात. राज्य सरकारांनी याविषयी कडक पावले उचलावीत आणि मुसलमानांना पूजासाहित्याची दुकाने लावण्यापासून रोखावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने नुकतीच येथे केली. हिंदूंची मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे या ठिकाणी एखादा मुसलमान पूजासाहित्य विकत असल्याचे आढळल्यास हिंदूंनी तात्काळ त्याविषयीची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे महासचिव बजरंग बाग्रा यांनी केले आहे.
केदारनाथसारख्या काही हिंदु तीर्थक्षेत्री मुसलमानांनी दुकाने थाटली आहेत आणि ते भक्तांना प्रसाद आणि इतर पूजासाहित्य विकत आहेत. कायदेशीररित्या कुणी त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही; परंतु मुसलमान दुकानदारांनी ग्राहकांना खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू देण्याआधी त्यांवर थुंकल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मुसलमानांना हिंदूंच्या मंदिरांच्या परिसरात दुकाने थाटण्यास आणि पूजासाहित्य विकण्यास राज्य सरकारांनी प्रतिबंध केला पाहिजे, जेणेकरून हिंदु भाविकांच्या श्रद्धा दुखावल्या जाणार नाहीत, असे श्री. बाग्रा यांनी म्हटले आहे.
विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, मुसलमान त्यांची ओळख लपवून मंदिरे आणि हिंदूंची धार्मिक स्थळे येथे पूजासाहित्य विकत आहेत. हिंदूंनी अशा दुकानदारांची ओळख पटवून त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवावे. अशा तक्रारींवर स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि हिंदु धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीही बन्सल यांनी सर्व राज्य सरकारांना केली आहे.