शाळा आणि धार्मिक स्थळे यांच्याजवळ दारूचे दुकान नको ! – सडये-शिवोली पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

म्हापसा, ८ जुलै (वार्ता.) – गावातील शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळे यांच्या १०० मीटरच्या आत दारूच्या दुकानांना अनुज्ञप्ती न देण्याचा ठराव सडये-शिवोली पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. पंचायतीच्या सरपंच दीपा पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलै या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला.

हल्लीच सरकारने शैक्षणिक संस्था आणि धार्मिक स्थळे यांच्या १०० मीटर अंतराच्या आत असलेल्या मद्यालयांना दुप्पट कर आकारून अनुज्ञप्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा विषय ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडला आणि गावात सरकारच्या या निर्णयाच्या कार्यवाहीला ठाम विरोध दर्शवण्यात आला. यानुसार ठरावही संमत करण्यात आला. ग्रामसभेत इतर विषयांवरही चर्चा झाली.

संपादकीय भूमिका 

या निर्णयाबद्दल सडये-शिवोली पंचायतीचे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन !