पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरल्याच्या प्रकरणी धृपदा भोसले हिला २ जुलै या दिवशी हडपसर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांचा डोळा चुकवून ३ जुलैला भोसले पळून गेली. या प्रकरणी कर्तव्यात दायित्वशून्यता आणि निष्काळजीपणा केल्याने महिला पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीसदलाची प्रतिमा या प्रकाराने मलीन झाली असून त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :पोलीसदलात असे अकार्यक्षम पोलीस असल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे ! |